मित्रांनो, एक आनंदाची बातमी समोर आली आहे. २०२६ या मेगाभरतीमध्ये जलसंपदा विभागातील १४ हजार पदांच्या समावेश करण्यात येणार आहे. हि नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमीच आहे. या विभागात असलेल्या रिक्त पदांचे विवरण समोर आले असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. जलसंपदा विभागात वर्ग क आणि ड साठी जवळपास ४३ आणि २१ अशा विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भरती होणार असल्याने अनेकाना नोकरीची संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात नुकतीच बैठक झाली. राज्यात लवकरच नव्या पद्धतीने नोकर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. सुमारे ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे २० हजार पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी मुख्य सचिव यांच्यासह प्रशासनातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सचिव उपस्थित होते.
राज्यात पुन्हा एकदा मेगा नोकर भरतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. राज्यात विविध विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला जात असून विविध विभागांना त्यांचे आकृतिबंध मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नोकरभरतीबाबत सरकार कुठेही मागे नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यावर भरती करताना कंत्राटी पद्धतीने भरती नको, अशी भूमिका कर्मचारी संघटनेने घेतली आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात राज्यात विविध विभागात ७५ हजार नोकर भरतीची घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र एक लाखाहून अधिक पदांची भरती करण्यात आली असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सरकारच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विभागांना त्यांचा आकृतिबंध मंजूर करण्याचे तसेच सेवा प्रवेश नियम तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उपरोक्त संदर्भिय शासन निर्णय क्र. १ च्या अन्वये स्थापित समन्वय समितीव्दारे संदर्भिय पत्र क्र. २ अन्वये जलसंपदा विभागांर्तगतची भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील नामनिर्देशानाच्या कोटयातील १४ संवर्गाची एकूण ४४९७ रिक्त पदे सरळसेवेने भरणेबाबत दिलेल्या शासन मान्यतेनुसार सरळसेवा भरती प्रक्रिया राबवणेत आली आहे. उपरोक्त भरती प्रक्रियेतर्गतची सर्व कार्यवाही पूर्ण करुन या परिमंडळाशी संबंधीत संवर्गनिहाय उमेदवारांची शिफारस यादी व प्रतिक्षायादी शासनाचे wrd.maharashtra.gov.in संकेतस्थळावर वेळोवेळी सुधारित करण्यात आली आहे.
मागील अपडेट्स
कालवा निरीक्षक पदे वाढणार प्रगत तंत्रज्ञानामुळे अनेक पदांची गरजच राहिली नाही. त्यामुळे या पदांवर गंडांतर येणार आहे. याशिवाय यांत्रिकी विभागातील बहुतांशी पदे कमी करण्यावर भर राहणार आहे. असे असले तरी पुढील काळात काही पदे वाढविण्यावर भर असेल. त्यामध्ये पाणीपट्टी वसुलीसाठी ‘कालवा निरीक्षक’ ही पदे वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कारण, कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी वसूल करणे हे एक अतिशय अवघड काम आहे. त्यासाठी या पदांची संख्या वाढू शकते.
लवकरच देणार अंतिम रूप
आकृतिबंधामध्ये कोणती पदे कमी करायची याबाबत राज्यातील जलसंपदा विभागाच्या विविध कार्यालयांकडून माहिती घेण्यात येणार आहे. त्यानुसार किती, कोणती पदे कमी करायची यावर विचारविनिमय झाल्यानंतर अंतिम निर्णय होईल. दरम्यान, आकृतिबंध तयार करण्याचे काम सुरू असून, लवकरच त्यास अंतिम रूप देण्यात येणार आहे.
जलसंपदा विभाग भरती २०२६ ही महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना सरकारी नोकरीसाठी एक चांगली संधी आहे. यामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक अशा दोन्ही गटांतील पदांसाठी भरती होत आहे. सार्वजनिक हित लक्षात घेऊन जलसंपत्तीचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागात विविध पदांसाठी २०२६ मधील मोठ्या प्रमाणातील भरतीची घोषणा करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही भरती एक उत्कृष्ट संधी ठरू शकते. या लेखात आपण भरतीसंबंधित तपशीलवार माहिती, पात्रतेचे निकष, अर्ज करण्याची पद्धत, निवड प्रक्रियेचा क्रम, वेतनमान तसेच महत्त्वाच्या तारखांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
- एकूण रिक्त पदे: 14,000 पेक्षा अधिक (अपेक्षित)
- पदांचे स्वरूप: कनिष्ठ अभियंता, स्टेनो, लिपिक, कनिष्ठ सहाय्यक, स्थापत्य सहाय्यक तसेच इतर तांत्रिक व अतांत्रिक पदे
- अर्जाची प्रक्रिया: ऑनलाइन माध्यमातून
- अधिकृत संकेतस्थळ: www.wrd.maharashtra.gov.in
शैक्षणिक अर्हता
- कनिष्ठ अभियंता – सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकानिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा पदवीधर असणे आवश्यक
- लिपिक – बारावी पास व मराठी-इंग्रजी टायपिंगचे प्रमाणपत्र आवश्यक
- तांत्रिक सहाय्यक पदे – संबंधित व्यवसायात ITI किंवा समतुल्य पात्रता आवश्यक
वयोमर्यादा
खुला – १८ ते ३८
मागास – १८ ते ४३
ऑनलाइन अर्जाची पद्धत (Jalsampada Vibhag Bharti 2026)
- अधिकृत संकेतस्थळ wrd.maharashtra.gov.in वर लॉगिन करा
- ‘Recruitment 2026’ या टॅबवर क्लिक करा
- मोबाईल नंबर व ईमेल वापरून नवीन नोंदणी करा
- सर्व आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज शुल्क ऑनलाइन भरा
- अंतिम अर्ज सबमिट करा व त्याची प्रिंट घ्या
लागणारी कागदपत्रे
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (10वी, 12वी, डिप्लोमा / डिग्री)
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- रहिवासी दाखला
- आधार कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- टायपिंग किंवा ITI प्रमाणपत्र (लागू असल्यास)
निवड पद्धती
- सर्व पदांसाठी Online परीक्षा अनिवार्य असेल
- संबंधित पदांसाठी कौशल्य चाचणी किंवा टायपिंग टेस्ट घेतली जाईल
- काही पदांसाठी मुलाखत घेतली जाऊ शकते
- त्यानंतर कागदपत्रे पद्ताडनी होईल
- यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल
महत्त्वाच्या सूचना
जलसंपदा विभाग भरती २०२६ ही महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना सरकारी नोकरीसाठी एक चांगली संधी आहे. यामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक अशा दोन्ही गटांतील पदांसाठी भरती होत आहे. त्यामुळे विविध शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. योग्य वेळी अर्ज करून तुमची तयारी पूर्ण करा!
- अर्जात चुकीची माहिती दिल्यास तो अमान्य केला जाईल
- एकच उमेदवार एकाच पदासाठी अर्ज करू शकतो
- भरतीबाबतची नवीन माहिती वेळोवेळी वेबसाइटवर तपासत राहा
- प्रवेशपत्र परीक्षा होण्याच्या साधारणतः 10 दिवस आधी प्रसिद्ध होईल
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.engineeramol.com ला भेट द्या.



